तुमची मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो- इंदुरीकर महाराज

अहमदनगर |  मी जे काही काही बोललो होतो ते माझ्या अभ्यासासानुसार बोललो होतो. मात्र प्रसारमाध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. माझ्या वक्तव्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात इंदुरीकर महाराजांनी आपला माफीनामा सादर केला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून माझ्या बोलण्याचा प्रसार माध्यमांनी विपर्यास केला. मात्र मी माझ्या अभ्यासानुसार बोललो होतो. माझ्या कीर्तनातील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं माफीनाम्यात त्यांनी म्हटलं आहे.

मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. गेल्या 26 वर्षांपासून समाजप्रबोधनाचं आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचं मी काम करत आहे. गेल्या 26 वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही प्रयत्न केले, असं म्हणत माझ्यावरचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, सोमवारी एक पत्रक काढून त्यांनी आपल्या चाहत्यांना आणि भक्तांना कुठलेही मोर्चे, आंदोलन किंवा एकत्र न जमण्याचं आवाहन केलं होतं. आपल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या, असं इंदुरीकर महाराजांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-8 दिवसांनंतर अखेर इंदोरीकर महाराजांनी नमतं घेतलं….!

-तुकाराम महाराजांचे वंशज म्हणतात, ‘इंदोरीकरांमुळे कीर्तनाचा दर्जा घसरतोय!’

-“तृप्ती देसाई, तुम्ही नगरमध्ये पाय ठेवून दाखवाच”

-गेल्या 25 वर्षात इंदोरीकरांनी समाजात मोठ्या प्रमाणात प्रबोधन घडवलं- बाळासाहेब थोरात

-मोर्चाचं नियोजन केलंय पण भाजपचे कार्यकर्ते तर बिळात शिरलेत- नवाब मलिक