इंदोरीकरांचा ‘तो’ व्हीडिओ अंनिसच्या हाती; महाराजांच्या अडचणीत वाढ!

अहमदनगर | प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदोरीकरांविरोधात असणारे पुरावे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केले आहेत.

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली गेली होती.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना जवळपास क्लीनचीट दिली होती. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचा व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला होता. पोलिसांच्या सायबर सेललाही इंटरनेटवर असा कुठलाही व्हिडीओ आढळला नव्हता.

दरम्यान, पुराव्याअभावी इंदोरीकर महाराजांना क्लीनचीट मिळण्याची शक्यता होती, मात्र अंनिसनं या प्रकरणात लक्ष घातलं असून या प्रकरणाचे व्हिडीओ शोधून काढले आहेत. आता हेच व्हिडीओ जिल्हा शल्य चिकीत्सकांना देण्यात आले असून १५ दिवसांत इंदोरीकरांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अमृता फडणवीसांना तोंड आवरायला सांगा; शिवसेना नेत्याचं संघाला पत्र

-‘उद्धवच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं’; भाजपची बोचरी टीका

-खासदारकी वाचवण्यासाठी जयसिद्धेश्वरांची धडपड, म्हणतात…

-काश्मिरी तरुणीने गायलेलं मराठी गाणं राज ठाकरेंनी केलं शेअर

-काश्मिरी तरुणीने गायलेलं मराठी गाणं राज ठाकरेंनी केलं शेअर