अमृता फडणवीसांना तोंड आवरायला सांगा; शिवसेना नेत्याचं संघाला पत्र

मुंबई |  राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आवरा, अशा आशयाचं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भैय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. बुधवारी अमृचा फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची तुलना रेशमी किड्याशी केली होती. याच पार्श्वभूमीवर तिवारी यांनी भैय्याजी जोशींना हे पत्र लिहिलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे फार काळासाठी माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, अशा प्रकारचं वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. त्यांच्या याच विधानाचा संदर्भ लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी बोलताना जरा भान ठेऊन बोलायला हवं. अशाने शिवसेना आणि भाजपमधले संदर्भ आणखीनच ताणले जात असल्याचं तिवारी यांनी पत्रात म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची घमेंड आणि अतिआत्मविश्वास महाविकास आघाडी घडून येण्याचं खरं कारण आहे, अशी आठवणही तिवारी यांनी पत्रातून संघाला करून दिली आहे. दुसरीकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या पत्नींचं उदाहरण देत अमित शहा, नितीन गडकरी यांच्या पत्नी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना शिव्या देत नाहीत, असंही तिवारी यांनी म्हटलं आहे.

सीतेनेही रावणाला शिव्या घातल्याचं ऐकिवात नाही. जे करायचं ते राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी केलं.अमृता भाजपला टेकओव्हर करू इच्छितात का? असं भाजपचे नेते विचारत आहेत. अमृतांच्या वर्तनामुळे भाजपला 2024 मध्ये नुकसान होऊ शकतं, असंही तिवारींनी पत्रात म्हटलं आहे.

रेशमी किड्याला आयुष्यातील उपहास समजणार नाही. कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन रेशमी आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होत असते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिनान वाटतो, असं ट्विट बुधवारी अमृता फडणवीस यांनी केलं होतं. या ट्वीमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं होतं. आदित्य ठाकरेंवरील टीकेनंतर मात्र शिवसेनेने अमृता फडणवीसांवर यांचा जोरदार समाचार घेतला.

दरम्यान, याआधीदेखील अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत विरोधकांवर निशाणे साधणारे ट्वीट केले आहेत. विशेषत: सेनेवर त्यांनी कित्येकदा टीकेचे बाण सोडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘उद्धवच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं’; भाजपची बोचरी टीका

-खासदारकी वाचवण्यासाठी जयसिद्धेश्वरांची धडपड, म्हणतात…

-काश्मिरी तरुणीने गायलेलं मराठी गाणं राज ठाकरेंनी केलं शेअर

-काश्मिरी तरुणीने गायलेलं मराठी गाणं राज ठाकरेंनी केलं शेअर

-भाईजानच्या खास अंदाजात येणार ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक!