मी आताच मुख्यमंत्री आहे… मला उभा राहून काय करायचंय- इंदुरीकर महाराज

अहमदनगर |  संगमनेर तालुक्यातील कसारे गावात इंदुरीकर महाराजांचं किर्तन होतं. किर्तन अगदी  रंगात आलं होतं. तेवढ्यात इंदुरीकर महाराजांनी संगमनेरमधला किस्सा सांगितला अन् उपस्थित पोट धरून हसायला लागले. पुरग्रस्तांना मदतनिधी देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर गेलो तर माध्यमांनी विनाकारण मी भाजपत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या. मी आताच मुख्यमंत्री आहे… मला उभा राहून काय करायचंय… असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

भाजपच्या व्यासपीठावर गेलो, तो सामाजिक कार्यक्रमासाठी आणि धनादेश सुपूर्द करण्यासाठी, समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे, त्यामुळे कधीही राजकारणात येणार नाही, असं महाराजांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या भाजप प्रवेशाचा अंदाज लावला जात होता.

मी कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू मनामध्ये ठेवलेला नव्हता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी तो एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आणि कोणत्याही पक्षाचं उपरणं गळ्यात न घालता तिथून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निघून गेलो, असं इंदुरीकर महाराजांनी सांगितलं आहे.

मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असं इंदुरीकर महाराजांनी स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी बाळासाहेब थोरातांनी मात्र इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा आहे, असं जाहीर करून टाकलं आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात इंदुरीकर महाराज बाळासाहेब थोरातांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चेतली हवा महाराजांनी काढून घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-