शरद पवारांना मी देव मानतो- इंदुरीकर महाराज

अहमदनगर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देव मानणारा माणूस म्हणून उभा महाराष्ट्र मला ओळखतो. तसेच विखे आणि थोरात घराण्यावर माझे सारखेच प्रेम आहे, असं प्रतिपादन इंदुरीकर महाराजांनी केलं आहे.

संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. दिवगंत बाळासाहेब विखे यांच्यातील सर्व गुण खासदार सुजय विखे यांच्यात आले आहेत, तर शरद पवार यांचे सर्व गुण आमदार रोहित पवार यांच्यात आले आहेत, असंही इंदुरीकर महाराजांनी यावेळी म्हटलं.

राजकारण आणि धार्मिकता या बाबी रक्तातच असाव्या लागतात. या गोष्टी बाहेरुन येत नाहीत, असंही इंदुरीकर महाराजांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांची घोड्याच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते उपस्थित होते. त्यांनी सर्व उपस्थित पाहूण्यांचे आभार मानले.

महत्वाच्या बातम्या-

-जे सत्तेसाठी राष्ट्रवादीला सोडून गेले त्या सगळ्यांची वाट लागली- धनंजय मुंडे

-असं कोणी लिहून घेत नसतं; अशोक चव्हाण सहज बोलले असतील- रोहित पवार

-महादेव जानकर तुम्ही गप्प बसा… पाशा पटेलांनी दटावलं; पाहा व्हीडिओ

-बायको अन् भावाची धारदार कुऱ्हाडीने केली हत्या; आईने मध्यस्थी केली तर तिच्यावरही हल्ला!

-नागपुरात 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार…. नंतर गुप्तांगात रॉड टाकून अत्याचार!