“फडणवीसांना आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नसून त्यांना चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं वाटत”

मुंबई  | भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळचा फडणवीसांचा हातात बूट घेऊन माध्यमांशी बोलतानाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोवरून राष्ट्रवादीने फडणवीसांचा चांगलांच समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नसून चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं वाटत असेल, म्हणून बुट हातात घेऊन भाषण केलं असावं, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी आपण गेली पाच वर्षे राज्याचा विकास किती जलदगतीने केलाय, हे घसा ताणुन सांगत होता. प्रत्येक भाषणात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे हे ढोल बडवत सांगत होता. चक्क आपण आज आंदोलनात सहभागी झालात, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विरोधात आहेत मान्य आहे, पण महाविकासआघाडी सत्तेत येऊन महिनाच झाला आहे. पाच वर्षातील तुमच्या सत्तेतील हिशोब द्या, असं चाकणकर यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

शरद पवारांना मी देव मानतो- इंदुरीकर महाराज

-जे सत्तेसाठी राष्ट्रवादीला सोडून गेले त्या सगळ्यांची वाट लागली- धनंजय मुंडे

-असं कोणी लिहून घेत नसतं; अशोक चव्हाण सहज बोलले असतील- रोहित पवार

-महादेव जानकर तुम्ही गप्प बसा… पाशा पटेलांनी दटावलं; पाहा व्हीडिओ

-बायको अन् भावाची धारदार कुऱ्हाडीने केली हत्या; आईने मध्यस्थी केली तर तिच्यावरही हल्ला!