गब्बर इज बॅक! रोहित शर्मा संघाबाहेर, ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार

मुंबई | भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळावली आहे. (IndVsSa One day series)

कसोटी सामन्यांनंतर आता वनडे मालिका देखील खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

दुखापतीमुळे संघाच्या बाहेर असलेला नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माला संघातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहे.

रोहित शर्माच्या गैरहाजरीमध्ये आता भारताचा सलामीवीर के एल राहुल याच्या खांद्यावर भारतीय संघाची जबाबदारी असणार आहे. तर जस्प्रीत बुमराह भारताचा उपकर्णधार असणार आहे.

केएल राहुल, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन या फलंदाजांच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल

यजुवेंद्र चहल, आर अश्विन, डब्ल्यू सुंदर या तीन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता दक्षिण अफ्रिकेच्या मैदानावर भारतीय फिरकीपटू कमाल दाखवू शकतात.

जस्प्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज या गोलंदाजांच्या खांद्यावर भारतीय गोलंदाजीची कमान असेल.

महत्वाच्या बातम्या –

बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 16 दिवस बंद, पाहा तारखा

 लगोलग निघा! 31st निमित्त पुण्यातील ‘हे’ महत्त्वाचे रस्ते होणार बंद

“अज्ञानी, अशिक्षित, तिरस्करणीय…”, सोनम कपूरची मुनगंटीवारांवर जोरदार टीका

 चिमुकल्यानं उचलली चिठ्ठी अन् निकालच फिरला, शिवसेनेला मोठा धक्का

सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल