बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 16 दिवस बंद, पाहा तारखा

नवी दिल्ली | सध्या सर्वत्र नवीन वर्षाच्या आगमनाची तयारी केली जात आहे. परिणामी येणाऱ्या 2021 मधील काही गोष्टींच अवलोकन आणि 2022 मध्ये करायच्या कामाची यादी तयार करण्यात सर्वजण गुंग आहेत.

नवीन वर्षाच्या सुरूवातील काही आर्थिक व्यवहार करायचे ठरवले असतील तर रिझर्व्ह बॅंकेकडून जारी करण्यात आलेलं बॅंकांचं वेळापत्रक एकदा नक्की पहायला पाहीजे. कारण जानेवारी महिन्यात बॅंंकांना बऱ्याच सुट्ट्या असणार आहेत.

जानेवारी 2022 मध्ये देशभरातील बॅंकाना तब्बल 16 दिवस सुट्ट्या असतील. परिणामी आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या यादीवर एकदा नजर टाकणं गरजेचं आहे. आपल्या वेळापत्रकात बदल होणार आहेत.

देशभरात विविध राज्यांतील बँकांना अनेक उत्सव आणि कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या सुट्ट्या असतील. गंगटोकमधील सर्व बँका लॉसॉन्गच्या निमित्ताने बंद राहतील, तर इतर राज्यातील बँका सुरू राहतील.

स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त बँक सुट्टी फक्त कोलकातामध्ये लागू आहे. आरबीआयने प्रादेशिक सुट्ट्या आणि कॅलेंडरवर आधारित बँकांसाठी विविध सुट्ट्या ठेवल्या आहेत. जानेवारीमध्ये 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, बँकांच्या सुटीच्या काळातही ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील.

जानेवारी 2022 मध्ये बंद असणाऱ्या बॅंकांची यादी खालीलप्रमाणे.

प्रत्येक राज्यानुसार ही यादी दिली आहे.

1 जानेवारी 2022 – नवीन वर्षाचा दिवस (देशव्यापी सुट्टी)

3 जानेवारी 2022 – नवीन वर्षाचे सेलिब्रेशन/लोसुंग (सिक्कीम)

4 जानेवारी 2022 – लोसुंग (मिझोरम)

11 जानेवारी 2022 – मिशनरी दिवस

12 जानेवारी 2022 – स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन

14 जानेवारी 2022 – मकर संक्रांती (अनेक राज्ये)

15 जानेवारी 2022 – पोंगल (आंध्र प्रदेश, पुडुचेरी, तामिळनाडू)

18 जानेवारी 2022 – थाई पूसम (चेन्नई)

26 जानेवारी 2022 – प्रजासत्ताक दिन (देशभर)

31 जानेवारी 2022 –  मी-डैम-मे-फी (असम)

वरील सर्व सुट्ट्या या वेगवेगळ्या सण-उत्सवासाठी दिल्या आहेत.

जानेवारी 2022 मध्ये बॅंकांना असणाऱ्या साप्ताहीक सुट्ट्या खालिलप्रमाणे

2 जानेवारी 2022: रविवार

8 जानेवारी 2022: दुसरा शनिवार

9 जानेवारी 2022: रविवार

16 जानेवारी 2022: रविवार

22 जानेवारी 2022: चौथा शनिवार

23 जानेवारी 2022: रविवार

30 जानेवारी 2022: रविवार

जानेवारी महिन्यात काही आर्थिक व्यवहाराचं नियोजन करणार असाल तर वरील वेळापत्रक नक्की पहा. या वेळापत्रकानुसार बॅंकेच्या कामाबाबत नियोजन करता येईल. आरबीआयकडून वेळोवेळी वेळापत्रक जारी करण्यात येतं.

महत्वाच्या बातम्या –

 लगोलग निघा! 31st निमित्त पुण्यातील ‘हे’ महत्त्वाचे रस्ते होणार बंद

“अज्ञानी, अशिक्षित, तिरस्करणीय…”, सोनम कपूरची मुनगंटीवारांवर जोरदार टीका

 चिमुकल्यानं उचलली चिठ्ठी अन् निकालच फिरला, शिवसेनेला मोठा धक्का

सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल

‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल