“मोदी सरकारने नागरिकांना दिवाळी गिफ्ट म्हणून महागाई दिली”

नवी दिल्ली | सध्या देशात महागाईचा प्रचंड मोठा भडका उडाला आहे. परिणामी केंद्र सरकारवर सर्व स्तरातून जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतींनी शंभरी पार केली आहे. अनेक राज्यांत सध्या पेट्रोल 110 रूपये पेक्षा अधिक दरानं विकलं जात आहे. परिणामी या महागाईला केंद्र सरकार जाबाबदार असल्याचं गेहलोत म्हणाले आहेत.

मोदी सरकारनं नागरिकांना दिवाळी गिफ्ट म्हणून महागाई दिल्याची टीका अशोक गेहलोत यांनी केली आहे. देशभर काॅंग्रेसतर्फे महागाईविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महात्सव हा पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, यांच्या महागाईमुळं कायम ध्यानात राहील, असंही गहलोत म्हणाले आहेत. भाज्यांच्या किंमती ज्याप्रकरे वाढत आहेत, ते पहाता मोदी सरकारनं महागाई गिफ्ट दिल्यासारखं वाटत असल्याचं गेहलोत म्हणाले आहेत.

आधीची सरकरे सणाच्या अगोदर महागाई कमी करण्यावर भर देत होते. जेणेकरून सर्वसामान्यांना सण आंनदानं साजरा करता यावा, असं गहलोत यांनी म्हटलं आहे. गेहलोत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दिवाळीच्या फक्त तीन दिवस आधी मोदी सरकारनं व्यावसायित सिलेंडरच्या किमती 266 रूपयांनी वाढवून मिठाई महाग करून ठेवली आहे. परिणामी सर्वसामान्यांची दिवाळी कशी साजरी होणार, असा सवाल गेहलोत यांनी उपस्थित केला आहे.

पेट्रोलचे दर प्रतिलिटर 116 आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 108 रूपये झाले आहेत. मग अशात सामान्य नागरिकांनी त्यांची दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, असंही गेहलोत म्हणाले आहेत.

आमच्या सरकारनं गुणवंत विद्यार्थीनींना महाविद्यालायात जाण्यासाठी स्कूटींचं वाटप केलं आहे. पण विद्यार्थी मोदी सरकारला एवढे महाग पेट्रोल कसे घ्यायचे हे विचारत आहेत, असा टोला गेहलोत यांनी लगावला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याप्रमाणं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महागाीची तुलना कमलनाथ यांनी मोदींच्या दाढीशी केली आहे.

दरम्यान, वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. महाविकास आघाडीतर्फे राज्यात सायकल चालवून आंदोलन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

’25 वर्ष आम्ही नको ती अंडी उबवली’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर निलेश राणे म्हणतात…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दिली पुन्हा एकदा दिवाळीची भेट 

 “शिवसेनेच्या कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा, आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही”

“नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्यांची नार्को टेस्ट करा” 

पराभवानंतर सुभाष साबने यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…