इन्स्टाग्रामनं डिलीट केली ‘ती’ वादग्रस्त पोस्ट, संताप व्यक्त करत कंगना म्हणाली…

मुंबई| बाॅलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. यातच कंगना आता एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर कंगनाने ट्विटरवर अतिशय तीव्र शब्दांत पोस्ट लिहिली आणि यानंतर ट्विटरने कंगनाचे अकाऊंट कायमचे सस्पेन्ड करण्यात आले.

वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर मिरवणारी कंगना पुन्हा एकदा नव्या अडचणीत सापडली आहे. ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामने कंगनावर निशाणा साधला आहे. इन्स्टाग्रामने कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आहे.

कंगनाने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. मात्र इन्स्टाग्रामने कंगनाची ही पोस्ट परस्पर डिलीट केली आहे. इन्स्टाग्रामने हे पाऊल उचलल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरूनच संताप व्यक्त केलाय.

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. यात ती म्हणाली, “इन्स्टाग्रामने माझी पोस्ट डिलीट केली आहे, ज्यात मी करोनाला संपवून टाकेन अशी धमकी दिली होती. कुणाच्या तरी भावना दुखावल्या. म्हणजे दहशतवादी आणि कम्युनिस्टांबद्दल सहानभूती बाळगणारे ट्विटरवर पाहिले होते, मात्र कोव्हिड फॅन क्लब. कमाल आहे. इन्स्टावर दोन दिवस झाले आहेत. मात्र वाटत नाही एका आठवड्यापेक्षा जास्त टिकू शकते.” अशी पोस्ट शेअर करत कंगनाने इन्स्टाग्रामवरच निशाणा साधला आहे.

शनिवारी कंगनानं एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं, की तिला कोरोनाची लागण झाली आहे. तिनं कोरोना साधा ताप असल्याचं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टवरुन वाद झाल्यानं इन्स्टाग्रामनं ही पोस्ट डिलीट केली.

कंगनाने एक पोस्ट शेअर करत कोरोना झाल्याची माहिती दिली होती. फोटो पोस्ट करत कंगनाने कॅप्शनमध्ये, ‘गेल्या काही दिवसांपासून थकवा जाणवत होता. म्हणून हिमाचलला जाण्याचा विचार करत होती. त्याआधी कोरोना चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे स्वतःला घरीचं आयसोलेट केलं आहे. मला काहीचं कल्पना नव्हती व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करेल. पण आता मला माहित पडलं आहे. मी व्हायरसला नष्ट करेल..’

कंगना पुढे म्हणाली, ‘कोणालाही आपल्यावर वर्चस्व गाजवू देवू नका. जर तुम्ही घाबरलात, तर तो तुम्हाला जास्त घाबरवेल. आता कोरोनाला नष्ट करण्याची वेळ आली आहे..’ असं कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

kangana1

 

महत्वाच्या बातम्या – 

‘सगळे पुरूष एकसारखेचं असतात?’ म्हणत मीरा…

लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी नवरदेवाची वरात काढली थेट मक्याच्या…

अवघ्या 24 तासात विराट-अनुष्काकडून कोरोनाग्रस्तांसाठी…

कौतुकास्पद! 9 वर्षाच्या ‘या’ चिमुकलीनं देश…

स्वामींचा धावा करत अंकिता लोखंडेनं घेतला कोरोना लसीचा पहिला…