मोठी बातमी! भारतीय नागरिकांना कीव शहर सोडण्याचे आदेश

नवी दिल्ली | युक्रेनवर कब्जा मिळवण्याचं लक्ष घेवून मैदानात उतरलेली रशियन सेना आता युक्रेनला उद्ध्वस्त करत आहे. सातत्यानं एका एका शहरावर हल्ले करण्यात येत आहेत. अशातच भारतीय नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

युक्रेन हा जगातील वैद्यकिय शिक्षणासाठी प्रसिद्ध असणारा देश मानला जातो. युक्रेनमध्ये जगभरातून वैद्यकिय शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. भारतातील अनेक राज्यातील विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत.

भारतातील तब्बल 20 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये वैद्यकिय शाखेचं शिक्षण घेतात. अचानकपणे उद्भवलेल्या या युद्धाच्या परिस्थितीमुळं सर्वांना धक्का बसला आहे. युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून महत्त्वाची सुचना सर्वांना दिली गेली आहे.

युुक्रेनची राजधानी कीव शहरातून तत्काळ सर्वांनी बाहेर पडण्याची सुचना भारतीयांना दिली गेली आहे. परिणामी आता सर्व नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. कीव शहराच्या सिमेवर रशियन सैन्य मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यासाठी जमलं आहे. सध्या सुमारे 16 हजार भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत.

युक्रेन-रशिया या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय नागरिकांना सुखरूप सोडण्याचं मान्य केलं आहे. युक्रेन-पोलंड, हंगेरी या सिमेवर सध्या शेकडो भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. अशात दुतावासाकडून ही सुचना मिळाल्यानं सर्वत्र पळापळ होत आहे.

राजधानी कीव शहरातून मिळेल त्या मार्गानं सर्वांनी शहर सोडावं अशा सुचना भारतीयांना देण्यात आल्या आहेत. रशिया लवकरच कीव शहरावर मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे.

युक्रेनमधील भारतीय दुतावासानं सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्यास सांगितलं होतं. भारत सरकार आपल्या नागरिकांना परत घेऊन येण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, बुखारेस्ट आणि बुडापेस्ट या ठिकाणी भारतीय नागरिकांना नेण्यात येत आहे. जेणेकरून त्या ठिकाणावरून एअर इंंडियाच्या विमानानं त्यांना थेट भारतात आणता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं” 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय 

रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी 

“डॉक्टर हे नालायक, हरामखोर मारखाण्याच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका”