“नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, नाहीतर…”

मुंबई | राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आता नवाब मलिकांच्या अटकेसाठी भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय.

भाजपकडून (BJP) मात्र या अटकेचं जोरदार समर्थन केलं जात असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

गुन्हा कधीच लपत नाही. आता काही पुरावे समोर आले आहेत. दाऊदच्या प्रॉपर्टी बाबत तपास सुरू होता. फडणवीसांच्या काळात पुरावे समोर आले असते तर ही वेळ आली नसती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

देशविरोधी काम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना भारतात आणून त्यांना शिक्षा होण्याबाबत पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत. तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

संभाजीराजे छत्रपती यांना मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावं लागलं हे दुर्दैवी. संभाजीराजे या सरकारने किती वेळा तारखा दिल्या ते आठवा. राजेंचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला तर तो आनंद क्षणभंगुर असेल, असंही ते म्हणालेत.

आम्ही मराठा समाजाच्या मागण्यासाठी रस्त्यावर लढत राहू, तसेच संजय राऊत यांच्या टीकेची पातळी इतकी खाली गेली आहे की त्यांच्यावर आता आम्ही बोलणारच नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! रशियाविरोधात अमेरिका आक्रमक; उचललं मोठं पाऊल 

“चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले, हे सुद्धा देशाला कळायला हवं” 

पुतिन यांचा अमेरिकेला झटका; घेतला हा मोठा निर्णय 

रशिया-यूक्रेन युद्धाचा मोठा फटका; सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी