सिंगापूरच्या राजकारणात नेहरूंची एन्ट्री, पंतप्रधान ली शिंग लूंगचे भारतीय खासदारांना टोले

नवी दिल्ली | भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या क्षमतेचा पुरेपुर वापर करणारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली होती.

भारतीय लोकशाही ही जगातील एक महत्त्वाची लोकशाही मानली जाते. जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम केलं.

नेहरूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परराष्ट्रीय धोरणांवर पकड असलेला नेता मानलं जातं. सिंगापूरच्या संसदेत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी केलेल्या भाषणानं नेहरूंच्या कर्तुत्वाची प्रचिती सर्वांना आली आहे.

सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग लोकशाहीच्या मुल्यांवरून संसदेला संबोधित केलं आहे. संसदेत ली यांनी खासदारांना चांगलाच धडा शिकवला आहे. परिणामी सध्या त्यांच्या भाषणाची चर्चा सर्वत्र होत आहे.

आपापल्या राष्ट्रात लोकशाही कशी अबाधित राहील यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवेत. याविषयावर बोलताना त्यांनी भारतीय संसदेत गुन्हेगार आणि बलात्कारासारखे गुन्हे करणारे नेते बसल्याचं देखील वक्तव्य केलं आहे.

भारतीय संसदेप्रमाणं गुन्ह्यात सहभागी असलेली लोक आपल्याकडं नकोय, असंही ली म्हणाले आहेत. भारतीय लोकशाही मोठी करण्यात नेहरूंनी मोठं योगदान दिलं आहे. परिणामी त्यांच्या योगदानाला कधीही विसरता येणार नाही, असंही ली म्हणाले आहेत.

भारतीय स्वातंत्र्यात देखील नेहरूंचं योगदान महत्त्वाचं आहे. काळाच्या ओघात लोकशाहीची मुल्यं विसरून जात आहेत. त्यांच्या कर्तुत्वाला आणि लोकशाहीच्या मुल्यांचा आदर नेहमी केला पाहीजे असंही ली म्हणाले आहेत.

भारतीय लोकशाहीवर ली यांनी आपल्या भाषणादरम्यान अनेकदा स्तुतिसुमने उधळली आहेत. नेहरूंच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी लोकशाहीचा गौरव केला आहे.

दरम्यान, भारतीय संसदेतील खासदारांवर असलेल्या गुन्ह्यांबद्दल ली यांनी वक्तव्य केल्यानं त्यांच्या देशात त्यांचं भाषण प्रचंड गाजत आहे. ली यांच्या भाषणानं परत एकदा राजकीय गुन्हेगारीला वाचा फोडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मोदी सरकार लवकर ‘हा’ निर्णय घेणार

 “तीन पक्षांचं सरकार असलं तरी…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ

स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!

किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला