रोहित शर्माचं टेन्शन वाढलं! टीम इंडियाचे ‘हे’ दोन धाकड खेळाडू दुखापतग्रस्त

मुंबई | भारतीय क्रिकेट संघ सध्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे हैराण झाला आहे. केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल हे तीन महत्त्वाचे खेळाडू आधीच दुखापतग्रस्त आहेत.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला T-20 क्रिकेट सामना खेळला गेला. यादरम्यान भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव करत टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

दुखापतीमुळे केएल राहुल टी-20 मालिकेतून बाहेर आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे देखील टी-20 मालिकेपूर्वी दुखापतीमुळे खेळत नाहीत.

तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 18 फेब्रुवारीला होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. या सामन्यादरम्यान दीपक चहरला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

मैदानावर कायरन पोलार्डने मारलेला फटका रोखण्याच्या प्रयत्नात दीपक चहरच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. व्यंकटेश अय्यरलाही क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली.

वेस्ट इंडिजच्या डावात 17 व्या षटकात पोलार्डचा फटका थांबवताना वेंकटेशच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. मात्र, त्यानंत त्याने फलंदाजीला येत भारताला विजय मिळवून दिला होता.

दरम्यान, मागील सामन्यात रवी बिश्नोईला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, रवीने पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी करत तो सामन्याचा हिरो ठरला होता. त्यामुळे आता त्यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

हातात लाटणं घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अमृता फडणवीस म्हणायच्या ‘हे’ गाणं

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ

स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!

किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी