2020 आयपीएलचं वेळापत्रक झालं जाहीर!

मुंबई |  आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं बिगूल वाजलं आहे. येत्या 29 मार्चपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. ESPNCRICINFO या संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. आयपीएलचा पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे.

आयपीएल काऊंन्सिलने वेळापत्रक जाहीर केलं नसलं तरी आयपीएलमधल्या काही संघांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी आपापल्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

मार्च महिन्यांत भारत आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 18 मार्च रोजी ही एकदिवसीय सामन्यांची मालिका संपणार आहे. त्यानंतर 29 तारखेपासून आयपीएल सुरू होईल.

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-व्होडाफोन भारतातला आपला गाशा गुंडाळणार?

-“दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना विरोध करणं हे तर भाजपच्या DNA मध्ये”

-भीमा कोरेगावचा तपास NIA कडे देऊन एक पाऊल मागे घेतलेलं ठाकरे सरकार मोदींना ‘असा’ देणार शह?

-रामलीला मैदानावर आज आवाज घुमणार, मैं अरविंद केजरीवाल…..शपथ लेता हूँ की

-पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवली जाणं चुकीचं आणि दुर्दैवी- सुप्रिया सुळे