भारतातील सेवा बंद करणार व्होडाफोन?

नवी दिल्ली | एजीआर थकित देय रकमेपैकी किती रक्कम अदा करता येऊ शकते याचं मुल्यांकन सुरू असल्याने कंपनी कर्जात असल्याचं व्होडाफोन-आयडिया या दूरसंचार कंपनीने स्पष्ट केलं आहे. मात्र भारतात काम सुरू ठेवायचं की नाही हे न्यायालयाच्या निर्णयानंतर ठरवणार असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.

न्यायालयाने 24 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात कंपनी सध्या दूरसंचार विभागाला एजीआरवर आधारित देय रकमेपैकी किती रक्कम अदा करणं शक्य आहे, याचं मुल्यांकन करत आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये ही रक्कम भरण्याचा कंपनी निर्णय घेईल, असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास भारतातील कारभार बंद करण्याचा इशारा कंपनीने यापूर्वीच दिला आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या सकारात्मक निर्णयावरच कंपनीची भारतात कारभार सुरू ठेवण्याबाबतची क्षमता अवलंबून असेल, असं व्होडाफोन-आयडियाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना विरोध करणं हे तर भाजपच्या DNA मध्ये”

-भीमा कोरेगावचा तपास NIA कडे देऊन एक पाऊल मागे घेतलेलं ठाकरे सरकार मोदींना ‘असा’ देणार शह?

-रामलीला मैदानावर आज आवाज घुमणार, मैं अरविंद केजरीवाल…..शपथ लेता हूँ की

-पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवली जाणं चुकीचं आणि दुर्दैवी- सुप्रिया सुळे

-मुलींनी प्रेम करु नये हे समाजाने का ठरवावे… त्यांच्या भावनांचं काय??- सुप्रिया सुळे