मुंबई | कालपासून आयपीएलच्या 15व्या सिझनला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात केकेआरने चेन्नईचा पराभव केला.
आज मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना रंगल्याचं पहायला मिळालं. दोघांमधला सामना रोमांचक झाल्याचं पहायला मिळाला.
दिल्लीच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशननं संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे.
दिल्ली कॅपिटल्सने चार गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. दिलेले 177 धावांचे लक्ष्य दिल्लीने लिलया पेलत मुंबईला धूळ चारली आहे.
17 चेंडूत 38 धावांची खेळी करणारा अक्षर पटेलने मोलाची आणि आक्रमक साथ दिली. दिल्लीकडून कुलदीप यादवने देखील दमदार गोलंदाजी करत मुंबईचे 3 विकेट घेतल्या.
दिल्लीच्या विजयात अष्टपैलू अक्षर पटेलनं मोलाचा वाटा आहे. त्यानं 17 चेंडूत 38 धावा केल्या. त्यामुळे त्याचं जोरदाक कौतुक होत आहे.
मुंबईकडून इशान किशनने एकाकी झुंज देत 48 चेंडूत 81 धावा चोपल्या होत्या. मुंबईकडून ओपनर ईशान किशनने सर्वाधिक नाबाद 81 धावांची खेळी केली.
कॅप्टन रोहित शर्माने 41 धावा केल्या. तर पदार्पणवीर तिलक वर्माने 22 धावांचं योगदान दिलं.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा
“संजय राऊतांनी केलेली माझी चेष्टा अंगावर येणार आहे, आता खूप काहीतरी…”
“राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत”
“काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय”
“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा”