मुंबई | जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलला (IPL 2022) ओळखण्यात येतं. भारतीय क्रिकेट मंडळाकडून दरवर्षी आयपीएलचं आयोजन करण्यात येतं. अशातच आता आगामी हंगामाआधी आता मेगालिलाव होणार आहे.
भारतीय क्रिकेट मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं यावर्षी दोन नव्या संघांचा समावेश स्पर्धेत केला आहे. परिणामी ही स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. जगातील दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
आयपीएल 2022 च्या मेगालिलावाची तयारी जोरात सुरू झाली आहे. कारण आता काही मोजणीचेच दिवस उरले आहेत. त्यामुळे आता सर्वच संघाचे निवडकर्ते जोरदार तयारीला लागल्याचं दिसतंय.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 साठी चार खेळाडूंना कायम ठेवलंय. मेगा लिलावासाठी संघाकडे 48 कोटी शिल्लक आहेत. मेगा लिलावात मुंबई इंडियन्सचे निवडकर्ते तीन महत्त्वाच्या खेळाडूंना लक्ष्य करू शकतात.
मुंबईने यंदा रिलीज केलेल्या क्विंटन डी काॅकला पुन्हात संघात घेण्याच्या तयारीत आहे. कर्णधार रोहित शर्मासोहत क्विंटन सलामी देण्यासाठी सक्षम आहे. त्याचबरोबर तो विकेटकिपर देखील आहे. त्यामुळे त्यावर मुंबई मोठा डाव लावू शकते.
ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मिचेल मार्शला मुंबई इंडियन्स विकत घेण्याच्या तयारीत आहे. T20 विश्वचषकात मिचेल मार्शने T20 विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची क्षमता मार्शकडे आहे.
मागील आयपीएल हंगामात मुंबईसाठी बोल्ट आणि बुमराहची जोडी सुपरहीट राहिली होती. दोघांनी मिळून दोन मोसमात 38 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे यंदा रिलीज केलेल्या बोल्टला पुन्हा संघात घेण्यासाठी उत्सुक आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्डला रिटेन केलं आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये आणखी कोण कोण सामील होणार याकडे एमआय चाहत्यांचं लक्ष आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“सुप्रियाताई सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात हे मी सिद्ध करु शकतो”
टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा
शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू