दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय घट; वाचा आकडेवारी

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसत आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये निर्बंध लावण्यासोबतच सरकार लसीकरणावर भर देत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव कमी झालेला दिसतोय. पण तरीही सरकारनं काही क्षेत्रांवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. अशात राज्यात कोरोना आकडेवारीत सध्या घसरण नोंदवण्यात आली आहे.

राज्यात आज कोरोना आकडेवारीत घट झाली आहे. आज 15 हजार 252 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 30 हजार 235 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जानेवारीच्या सुरूवातीपासूनच राज्यातील रूग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याचं पहायला होती. काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्या 40 हजारांच्यावर गेली होती. पण सरकारकडून दररोज उपाययोजना करण्यात येत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील नवीन रूग्णसंख्या ही काही पटींनी वाढल्याचं पहायला होतं. राज्यासह मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 827 नव्या रुग्णाची भर पडली आहे. सध्या लसीकरण वाढवण्यात आलं आहे. अधिक प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा

 शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

 धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने