“पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून शारीरिक संबंध ठेवणं हे क्रौर्यच”

मुंबई | पती पत्नीचं नातं हे विश्वासानं तयार होतं असं म्हणतात. मात्र, अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळे महिलेला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

पत्नीवर हक्क दाखवण्याची परंपरा मागील अनेक पिढ्यांपासून रूढ होत आली आहे. मात्र, आता महिला आता आपल्या हक्कांबद्दल पुढे येत आवाज उठवताना दिसतात.

अशातच आता पती पत्नीच्या शारिरीक संबंधावर आधारित नागपूर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. 22 वर्षीय विवाहितेने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात केलेल्या अर्जावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने मोठं वक्तव्य केलं आहे.

नागपुरातील वाडी परिसरातील दाम्पत्याचं 2017 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस सुखात गेले. मात्र, हळूहळू नवरा रंग दाखवू लागला. नवऱ्याला दारू पिण्याची सवय होती.

लग्नानंतर काही दिवसांनंतर तो बायकोला मारहाण करू लागला. त्यानंतर नवरा बायकोमध्ये सात्त्याने वाद होत होते. नवरा शारिरीक संबंधांसाठी बायकोवर जबरदस्ती करत होता.

बायकोची इच्छा नसताना देखील त्याने अनेकदा तिला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. संबंध ठेवताना बायकोला बांधून ठेवू लागला. त्याचबरोबर तिने आरडाओरडा करू नये म्हणून तोंडात कापडाचा बोळा देखील कोंबत होता.

बायकोनं हा सर्व प्रकार सहन न झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयात अर्जावर सुनावणी करताना न्यायलयाने मोठं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं, हे क्रौर्यच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“टीकाकारांकडे लक्ष देऊ नका, धाडसानं काम करा”; शरद पवारांचा सरकारला कानमंत्र

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…

थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ