भाजपला फटकारत शरद पवारांनी महाविकास आघाडीला दिला कानमंत्र, म्हणाले…

मुंबई | राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे सरकारच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभा असल्याचं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार हे पत्राचाळ विकास कामाचं भुमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी मोठी टोलेबाजी झाल्याचं पहायला मिळालं आहे.

राज्य सरकारवर भाजपनं जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे हे घरी बसून राहणारे मुख्यमंत्री आहेत. तर हे सरकार शरद पवार चालवत आहेत, अशी टीकाही विरोधकांनी केली होती.

शरद पवार यांनी आपल्या भाषणानं विरोधकांवर निशाणा साधला आहे. आज मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्यांचा मोठा प्रश्न आहे. त्याचे निवारण करण्यासाठी धाडसाने निर्णय घेण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

स्वच्छ कारभार करण्याचा आपला निर्धार असल्यानंतर आरोपांची चिंता करायची गरज नाही. कारण आरोपांची चिंता करून आपण निर्णय घेण्यासाठी थांबलो तर त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाच्या विकासावर होत असतात, असंही पवार म्हणाले आहेत.

मी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत आहे. अनेक प्रकारचे उपक्रम राज्यात आणि देशात राबवले. कधी काळी टीका, आरोप झाले. पण त्याची फिकीर केली नाही. अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आले नाही, असं पवार म्हणाले आहेत.

राज्य सरकारने हाती घेतलेला उपक्रम पूर्ण करावा. घरांच्या कामाला जास्तीत जास्त गती द्यावी. ज्याठिकाणी निर्णय घ्यायचा आहे, तिथे धाडसाने घ्यावा. मला खात्री आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी धडाडीने निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील जनता राज्य सरकारच्या पाठिशी उभी राहील, याचा मला विश्वास आहे, अशाप्रकारे पवारांनी ठाकरे सरकारला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, राज्यात सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार वाद रंगला असताना पवार यांच्या वक्तव्यांनी ठाकरे सरकारला बळ मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…

थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ

नंबर 1 यारी! खचलेल्या लाडक्या चिकूसाठी युवराजने लिहिलं पत्र, म्हणाला…