‘या’ कंपनीवर ITची छापेमारी, कपाटात सापडलेले पैसे पाहून अधिकारीही चक्रावले

हैदराबाद | आयकर विभागाने हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयक विभागाच्या अधिकाऱ्यांना एका अलमारीत तब्बल 142 कोटी रूपये सापडले आहेत. ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात USA, यूरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. 

छापेमारीवेळी अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

जमीन खरेदीसाठी पैसे भरल्याचा पुरावाही सापडला आहे. त्यासह इतर अनेक कायदेशीर समस्या देखील ओळखण्यात आल्या आहेत. त्यात कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या खाली खरेदी केलेली जमीन, याचा समावेश आहे.

अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान अनेक बँक लॉकर सापडले आहेत, त्यापैकी 16 लॉकर चालवले जात आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, हैदराबाद येथील एका अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनीवर 6 ऑक्टोबर रोजी छापेमारी करण्यात आली होती.

आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचं ठिकाण ठरलं; ‘या’ ठिकाणी होणार यंदाचा मेळावा

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? अरेस्ट वॉरंटसह सीबीआय देशमुखांच्या घरी

‘फक्त शाहरूख खानवर निशाणा साधला जातोय’, आर्यन खान प्रकरणी दोन ज्येष्ठ पत्रकारांमध्येच जुंपली

“दादागिरी करुन महाराष्ट्र बंद केला तर मुंहतोड जवाब देण्यात येईल”

“केवळ बोटावर मोजण्या एवढ्या भाजप व्यापारी संघटनांंचा महाराष्ट्र बंदला विरोध आहे”