शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचं ठिकाण ठरलं; ‘या’ ठिकाणी होणार यंदाचा मेळावा

मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणारच आहे, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील, असं संजय राऊत म्हणालेत.

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा आहे, असं संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेचा पहिलाच दसरा मेळावा गतवर्षी पार पडला.

या मेळाव्यावर कोरोनाचं सावट होतं. याचमुळे शिवतीर्थावरची भव्य सभा टाळून सेनेचे मोजके नेते, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला होता.

शिवसैनिकांसाठी हा मेळावा ऑनलाईन देखील दाखविण्यात आला होता. याच मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला सारुन उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण करताना भाजपवर आसूड ओढले होते.

महत्वाच्या बातम्या-

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? अरेस्ट वॉरंटसह सीबीआय देशमुखांच्या घरी

‘फक्त शाहरूख खानवर निशाणा साधला जातोय’, आर्यन खान प्रकरणी दोन ज्येष्ठ पत्रकारांमध्येच जुंपली

“दादागिरी करुन महाराष्ट्र बंद केला तर मुंहतोड जवाब देण्यात येईल”

“केवळ बोटावर मोजण्या एवढ्या भाजप व्यापारी संघटनांंचा महाराष्ट्र बंदला विरोध आहे”

‘या तीन पक्षांनी त्यांच्या राजकीय स्वार्थापायी…’; राम कदमांचा हल्लाबोल