26 वर्षे लोकांना हसवतोय, मात्र आता माझ्यावरच रडण्याची वेळ आलीये; इंदोरीकर महाराज उद्विग्न

अहमदनगर | मी गेली 26 वर्ष लोकांना हसवत आहे पण आता माझ्यावरच रडण्याची वेळ आली आहे, अशी खंत प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केली आहे.

समाजातील हसणं कमी होत नाही. खळखळून हसल्यावर ताण कमी होतो. मी हसवतोय पण आता मलाच रडवायला लागले आहेत, असं इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. ते नगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

तरूण पिढी व्यसनातून बाहेर पडावी. त्यांनी आई-वडिलांना मान द्यावा. त्यांचा आदर करावे हेच मी सांगतो. कुटुंबातील संवाद हरवला आहे. घरात संवाद व्हावा प्रत्येक माणूस सुखी व्हावा हीच माझी प्रार्थना आहे, असं इंदोरीकर महाराज नगरच्या कार्यक्रमात म्हणाले.

दुसरीकडे मुलगा-मुलगी जन्माचा फाॅर्म्युला देऊन इंदोरीकर महाराज देशमुख चांगलेच गोत्यात आले आहेत. त्यातच त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. कारण इंदोरीकर महाराजांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी चांभार समाजाकडून करण्यात आली आहे. इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात चांभार समाजाचा अवमान केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी आणि चर्मकार समाजाने मुंबईतील वर्तक पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे इंदोरीकरांचं टेंशन वाढणार आहे.

इंदोरीकर महाराजांना काही संघटनांकडून विरोध झाल्यावर तरूण मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मागे उभा राहिला. इंदोरीकर महाराजांच्या मिरवणुका देखील काढल्या गेल्या. तसेच त्यांच्या समर्थनार्थ अनेकजण रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या-

-राममंदिरामुळे लोक आपल्याला मतदान करतील या भ्रमात राहू नका- चंद्रकांत पाटील

-दिल्लीत हवं तसं घडलं नाही म्हणून दंगल भडकवली; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

-देश तोडणाऱ्यांच्या मनात भिती निर्माण करा- गृहमंत्री अमित शहा

-भारतात 1 लाख लोकांनी स्वागत केलं अन् इथे 15 हजार लोकं आलेत; डोनाल्ड ट्रम्प यांची खंत

-जितेंद्र आव्हाडांच्या जवळ गेल्यावर कळालं त्यांचा स्वभाव कसा आहे; मुख्यमंत्र्यांची आव्हाडांवर स्तुतीसुमनं