राममंदिरामुळे लोक आपल्याला मतदान करतील या भ्रमात राहू नका- चंद्रकांत पाटील

औरंगाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर उभं केलं म्हणजे लोक आपल्याला मतदान करतील या भ्रमात राहू नका, अशा स्पष्ट सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांनी येत्या काळात लोकांच्या जगण्यामरणाचे प्रश्न घेऊन सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. येणाऱ्या काळात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जनतेचे मुद्दे घेऊन सरकारविरोधात एल्गार केला पाहिजे, असं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवसेनेचाही जोरदार समाचार घेतला. शिवसेनेचं बेगडी हिंदुत्व उघडं पाडण्यात यशस्वी झालो तर निवडणुकीत हमखास यश मिळेल पण त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, असं बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं असं म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री झाले. मुलालाही मंत्री केले, असं टीकास्त्र त्यांनी उद्धव ठाकरेंवर सोडलं.

दरम्यान, मुस्लिम आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा म्हणजे हा सरळसरळ दाढी कुरवाळण्याचा प्रकार असल्याचं म्हणत शिवसेनेचा खरा चेहरा आपण लोकांसमोर आणला पाहिजे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत हवं तसं घडलं नाही म्हणून दंगल भडकवली; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

-देश तोडणाऱ्यांच्या मनात भिती निर्माण करा- गृहमंत्री अमित शहा

-भारतात 1 लाख लोकांनी स्वागत केलं अन् इथे 15 हजार लोकं आलेत; डोनाल्ड ट्रम्प यांची खंत

-जितेंद्र आव्हाडांच्या जवळ गेल्यावर कळालं त्यांचा स्वभाव कसा आहे; मुख्यमंत्र्यांची आव्हाडांवर स्तुतीसुमनं

-अस्पृश्य निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचं कार्य श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोक्षेंची सावंतांनी उडवली खिल्ली!