जडेजाला लागलं पुष्पाचं याड! फलंदाजाला तंबुत धाडल्यावर म्हणाला, “मै झुकेगा नहीं”; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर भारतीय संघ 2 बाद 199 धावा केल्या आहेत.

आजच्या सामन्यात ईशान किशन कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला. रोहित शर्मा 44 धावा करून बाद झाला. तर दुसरा सलामीवीर ईशान किशनने 89 धावांची खेळी खेळली.

अखेरच्या काही षटकात श्रेयस अय्यरने वादळी खेळी करत भारताला 20 षटकात 199 पर्यंत पोहचलं. त्यानंतर श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेची सलामी जोडी तंबुत धाडली.

श्रीलंकेचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना कर्णधार रोहितने रविंद्र जडेजाला गोलंदाजीला बोलावलं. त्यावेळी श्रीलंकेच्या 3 विकेट पडल्या होत्या.

9 षटकात श्रीलंकेला फक्त 51 धावा करता आल्या होत्या. 9 व्या षटकात जडेजा आपलं दुसरं षटक घेऊन आला. त्यावेळी असलंका 17 धावावर तर चांदिमल 10 धावावर खेळत होता.

त्यावेळी जडेजाने टाकलेल्या एका शाॅर्ट लेन्थ बाॅलवर चांदिमल खेळण्यासाठी पुढे आला. त्यावेळी त्याला आलेला बाॅल समजला नाही. बाॅल चांदिमलला हुलकावणी देत विकेटकिपर ईशानच्या झोळीत जाऊन बसला.

ईशानकडे बाॅल आल्यावर त्याने कोणतीही चूक न करता चांदिमलला माघारी धाडलं. त्यावेळी जडेजाने पुष्पा चित्रपटातील दाढीखालून हात फिरवत डायलाॅग मारला.

जणू काही मै झुकेगा नही साला विकेट लुंगा, असं जडेजा चांदिमलला म्हणत असेल. जडेजाचा हा लूक पाहून समालोचक देखील आनंदी झाल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने हा सामना 62 धावांनी जिंकला आहे. श्रीलंकेला 20 षटकात केवळ 137 धावा करता आल्या.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्राला हादरवलेल्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

संकटकाळी युक्रेनच्या लोकांना येतीये ‘या’ महिलेची आठवण; रशिया फक्त नावानेच थरथर कापायचा 

रशिया-युक्रेन युद्धाचा मद्यप्रेमींनाही झटका; आली ही महत्त्वाची माहिती समोर

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सुचना!

“संजय राऊतांची मानसिक स्थिती खराब झालीये हीच आत्ताची ब्रेकिंग न्यूज”