शिंजो अबे यांच्यावर हल्ला करणारी ‘ती’ व्यक्ती ताब्यात, महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जपानच्या नारा शहरात शिंजो अबे यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली.

या हल्ल्यानंतर शिंजो अबे जागीच कोसळ्याने त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पश्चिम जपानमधील नारा येथे भाषण करत असताना शिंजो अबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

शिंजो अबे यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तिला ताब्यात घेतलं. पोलिसांनी शिंजो अबेवर हल्ला करणारी व्यक्ती म्हणून नारा शहरातील एका रहिवासीला अटक केली आहे.

40 वर्षीय तेत्सुया यामागामीची अपनीज पोलीस अधिकाऱ्यांनी ओळख पटवली आहे. तर यामागामीने हल्ला केल्याचा पोलिसांना संशय असून त्यांनी हाताने बनवलेली एक बंदूक देखील जप्त केली आहे.

शिंजो अबे यांच्यावर असमाधानी असल्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचं यामागामीने पोलिसांना सांगितलं. तर पोलिसांकडून यामागामीची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

जपानी न्यूज एजन्सी NHK च्या अहवालानूसार, यामागामीने 2005 पर्यंत सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्समध्ये काम केलं आहे.

दरम्यान, शिंझो यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या छातीतून खूप रक्तस्त्राव झाल्याची माहिती समोर आली. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी शिंजो अबे यांच्या तब्येतीबाबत माहिती असून त्यांची तब्येत अत्यंत नाजूक व गंभीर असल्याचं किशिदा यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘गाफिल राहू नका, नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार, महत्त्वाची माहिती समोर

उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याने शिंदे गट आक्रमक, सोमय्यांविरोधात फडणवीसांकडे केली तक्रार

एक दुर्घटना अन् शहाजी बापू पाटील थोडक्यात बचावले

मुंबईकरांनो सावधान! मुंबईत पावसाचा तडाखा, प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय