‘… त्यामुळे नांदा सौख्यभरे अशाच शुभेच्छा देतो’, छगन भुजबळांचा शिंदे सरकारला टोला

मुंबई | शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं व नवं शिंदे सरकार सत्तेत आलं. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार 6 महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही, असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.

राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नवीन सरकारबद्दल बोलताना भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकावी अशी प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, अनेकजण ईडीच्या धाकापोटीच भाजपमध्ये गेलेत, असा आरोप छगन भुजबळांनी केला आहे.

लग्न झाल्यावर आपण लगेच घटस्फोट घ्या असं म्हणत नाहीत. त्यामुळे नांदा सौख्यभरे अशाच शुभेच्छा मी देतो, असा अप्रत्यक्ष टोला छगन भुजबळांनी शिंदे सरकारला उद्देशून लगावला आहे.

राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारने जनतेची कामं मार्गी लावावीत, असंही छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यात आता सर्वांचं लक्ष शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवरीन सुनावणीकडे लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शिंजो अबे यांच्यावर हल्ला करणारी ‘ती’ व्यक्ती ताब्यात, महत्त्वाची माहिती समोर

पेंग्विनची चेष्टा यात्रा म्हणत निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

काळजी घ्या! राज्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

‘गाफिल राहू नका, नव्या चिन्हाचीही तयारी ठेवा’; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश

मोठी बातमी! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार, महत्त्वाची माहिती समोर