जेसन राॅयची वादळी खेळी! फक्त 36 चेंडूत झळकावलं शतक; पाडला षटकारांचा पाऊस

ओव्हल | येत्या काही दिवसांमध्ये आयपीएलच्या मेगा अॅक्शनला (IPL Mega Auction) सुरूवात होत आहे. त्यामुळे आता सर्वच संघाच्या निवडकर्त्यांचं खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष लागलं आहे.

अशातच आता इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन राॅयने (Jason Roy) विस्फोटक शतक ठोकत सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत. येत्या काही दिवसात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.

या मालिकेच्या सुरूवातील सराव सामने खेळले गेले. त्यावेळी जेसन राॅयने गोलंदाजांच्या बत्त्या गुल केल्या आहे. जेसनने केवळ 36 चेंडूत शतक झळकावलं आहे.

किंगस्टन ओव्हल याठिकाणी हा सराव सामना खेळला गेला. त्यावेळी जेसन सुरूवातीपासून फटकेबाजी सुरू केली. सलामीला आलेल्या जेसन राॅयने टाॅम बँटनसह धुवांधार सुरूवात केली.

दोघांनी पहिल्या विकेटसाठी 141 धावांची भागेदार केली होती. जेसन राॅयने यावेळी 300 च्या पार गेला होता. जेसनने पुर्ण सामन्यात 244 च्या स्टाईक रेटने फलंदाजी केली होती.

राॅयने केवळ 47 चेंडूत 115 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 10 गगनचुंबी षटकार देखील खेचले आहेत. जेसनच्या शतकामुळे इंग्लंडला 20 षटकात 231 धावा केल्या आहेत.

दरम्यान, इंग्लंडच्या गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केल्यानं इंग्लंडने हा सामना 94 धावांनी जिंकला. या खेळीसह आता जेसनने अॅक्शनसाठी आपली मजबूत दावेदारी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अनिल देशमुखांचा वाईट काळ संपेना, आता समोर आली ‘ही’ मोठी माहिती

टाटांच्या गाड्या कुणाला परवडणार?, किमतीबाबत सर्वात मोठे बदल जाहीर

 किरण मानेंना मिळाला नवा चित्रपट, म्हणाले “पहिलं शेड्यूल संपलं आता…”

“गृहमंत्री अमित शहा आणि लष्करप्रमुख मनोज नरवणेंना अटक करा”

‘…अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे’; चित्रा वाघ संतापल्या