“आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राचा लढवय्या लेक कोरोनाच्या विरोधात लढत आहे”

पुणे | आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राचा लढवय्या लेक मैदानात आहे, असं म्हणत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिलेदाराचा अभिमान असल्याचंही जयंत पाटील यांनी नमूद केलं. जयंत पाटील यांनी ट्विटरवर राजेश टोपेंच्या कामाचा एक व्हिडीओ पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली.

कोरोनावर मात करण्यासाठी राज्यसरकारने कंबर कसली आहे. आरोग्यमंत्री या नात्याने राजेश टोपे अहोरात्र झटत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाच्या स्वास्थ्याची काळजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराला सलाम. जनसेवेसाठी सदैव कार्यरत रहा या शुभेच्छा. संकट मोठं आहे, पण त्यावर मात करू, असं जयंत पाटील म्हणाले.

राजेश टोपे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावत कोरोना व्हायरस विरोधात जमिनीवर उतरुन काम करत आहेत. याचीच नोंद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजेश टोपे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये मदतीसाठी सरसावले ‘हे’ उद्योगपती

-वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी जिओचा खास प्लॅन लाँच; मिळणार तब्बल 102 जीबी डेटा

-“चीनने आपल्या कोरोना व्हायरससंबंधी लवकर माहिती द्यायला हवी होती”

-अमेरिकेत कोरोनाची दहशत; 24 तासांत 100 जणांचा मृत्यू

-“संकट किती भयंकर आहे ह्याची कल्पना काही लोकांना नाही, आता संचार बंदी लागू करा”