महिला दिनी जयंत पाटील फेसबुक लाईव्हद्वारे करणार कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव

मुंबई| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील जागतिक महिला दिनानिमित्त दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत फेसबुकद्वारे महिलांशी संवाद साधणार आहे. या फेसबुक लाईव्हद्वारे जयंत पाटील राज्यभरातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव करणार आहे.

या फेसबुक लाईव्हची विशेष बाब म्हणजे. या फेसबुक लाईव्हमध्ये जयंत पाटील यांच्यासह इस्लामपूरच्या रेडिओ जॉकी शीतल साळुंखे ही उपस्थित राहणार आहे.

शीतल साळुंखे या दृष्टीहीन असून आपल्या कलेच्या माध्यमातून नागरिकांना नेत्रदान करण्याचे आवाहन करतात. शीतल यांनी आतापर्यंत अनेकांना नेत्रदान करण्यासाठी प्रेरीत केले आहे.

तुम्हीही समाजोपयोगी काम करत असाल, तुम्हीही काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असाल तर या फेसबुक लाईव्हमध्ये आपणही सहभागी होऊ शकता असे आवाहन जयंत पाटील यांनी महिलांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मुख्यमंत्रीसाहेब, बारामतीकरांची तमा न बाळगता पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाला निधी द्या”

-महिला दिनी राज ठाकरेंच्या खास शैलीत शुभेच्छा

-राज ठाकरे वर्धापनदिनी घेणार ‘हा’ मोठा निर्णय!

-कामगारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कामगार मंत्र्यांना, मला नाही- अमोल कोल्हे

-“राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण लोकहिताच्या कामाला स्थगिती देऊ नका”