अरे देवा…यांनी तर तुम्हालाही रांगेत उभं केलं; प्रकाश राज यांची टीका

दिल्ली | पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिराचे विविध राष्ट्रीयकृत बँकेत असलेले 545 कोटी रूपये महिनाभराआधी येस बँकेत जमा करण्यात आले आहेत. आता हे पैसे अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर साऊथ व बॉलिवूड स्टार प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘हे भगवान, आपको भी लाईन में खडा कर दिया. जगन्नाथ पुरीचे 545 कोटी रूपये येस बँकेत फसल्याने भक्तांना चिंता असायलाच हवी, असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. ग्राहकांना महिन्याभरासाठी बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढता येणार आहेत.

दरम्यान, येस बँकेतील ठेवीदारांचा एकही पैसा बुडणार नाही, सर्वांचे पैसे परत मिळतील, असं आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं आहे. असे असले तरी ठेवीदारांचे टेंशन दिवसेंदिवस वाढत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-महिला दिनी जयंत पाटील फेसबुक लाईव्हद्वारे करणार कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव

-“मुख्यमंत्रीसाहेब, बारामतीकरांची तमा न बाळगता पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाला निधी द्या”

-महिला दिनी राज ठाकरेंच्या खास शैलीत शुभेच्छा

-राज ठाकरे वर्धापनदिनी घेणार ‘हा’ मोठा निर्णय!

-कामगारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कामगार मंत्र्यांना, मला नाही- अमोल कोल्हे