‘प्रॉमिस डे’ला जयंत पाटलांनी शरद पवारांना दिलं ‘प्रॉमिस’, म्हणाले…

मुंबई | ‘प्रॉमिस डे’ चे औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रॉमिस आदरणीय शरद पवारसाहेब आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.

मंत्री जयंत पाटील यांचं सोशल मीडिया तसे तरुणांमध्ये असणाऱ्या ट्रेंडवर नेहमीच लक्ष असतं. सोशल मीडियावर असलेला ट्रेंड ते नेहमीच फॉलोही करतात.

सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू असून व्हेलेंटाईन वीकमध्ये आज ‘प्रॉमिस डे’ आहे हे लक्षात येताच मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार आणि कार्यकर्त्यांना ट्वीटरवर ‘प्रॉमिस’ केलं आहे.

आज ‘प्रॉमिस डे’ चं औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचे प्रॉमिस शरद पवार आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

या अनोख्या प्रॉमिसची सध्या प्रॉमिस डेच्या निमित्ताने चर्चा रंगताना पहायला मिळत आहे. सध्या राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादीतल्या इनकमिंगने राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन आले आहेत.

मंत्री जयंत पाटील यांचं सोशल मीडिया तसेच तरुणांमध्ये असणाऱ्या ट्रेंडवर नेहमीच लक्ष असतं. सोशल मीडियावर असलेला ट्रेंड ते नेहमीच फॉलोही करतात.

सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू असून व्हेलेंटाईन वीकमध्ये आज ‘प्रॉमिस डे’ आहे हे लक्षात येताच मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकर्त्यांना ट्वीटरवर ‘प्रॉमिस’ केले आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘आज प्रॉमिस डे’ ! आजच्या या दिनी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांना शब्द आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, वाडी,वस्तीपर्यंत अत्यंत मजबुतीने बांधण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असं प्रॉमिस केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL Auction 2022 : लिलावात दिल्ली कॅपिटल्स लावणार ‘या’ 10 खेळाडूंवर बोली 

देशाच्या संरक्षणमंत्र्यांनाही आवरेना ‘पुष्पा’चा मोह, म्हणाले “फ्लावर भी और फायर भी”

झिका व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड झालाय?, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

IPL Auction 2022: मेगा लिलावापूर्वी रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

तरुण पिढीत वेगानं पसरतोय ‘हा’ आजार; सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय व्हिडीओ