अजित पवार नाही तर जयंत पाटील राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते

मुंबई | राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांची अधिकृत नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नसून जयंत पाटलांकडेच त्याचे अधिकार असल्याचं कळतंय.

राष्ट्रवादीने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचं पत्र काल दिलं. त्यानुसार जयंत पाटीलच गटनेते असतील तसेच त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असेल, अशी माहिती आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हीप काढण्याचा कोणताही अधिकार नाही. ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे. त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्वतः घेतो, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आमदारांना दिली होती.

महत्वाच्या बातम्या-