“…तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतूक करणार नाहीत”

मुंबई | भोंग्यांच्या विषयावरून राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेवर सत्ताधारी जोरदार हल्ला करत आहेत.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना जोरदार चिमटे घेतले आहेत. राज ठाकरेंनी नुकतंच उत्तर प्रदेश राज्यातील प्रशासन आणि सरकारचं कौतूक केलं आहे.

पाटील यांनी राज ठाकरेंच्या परप्रांतिय धोरणावर जोरदार हल्ला चढवला आहे. राज ठाकरेंनी याआधी गुजरातचं कौतूक केलं होत आता उत्तर प्रदेशचं कौतूक केलं आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

राज ठाकरे हे जोपर्यंत राज्यात त्यांचे बंधू सत्तेत आहेत तोपर्यंत राज्याचं कौतूक करणार नाहीत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यावरून राजकारण तापलेलं असताना पाटील यांनी कोणाला बोलायला बंदी घालण्याचं काही कारण नाही, असं म्हणत सभेवर जास्त भाष्य करणं टाळलं आहे.

देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे, श्रीलंकेमध्ये काय परिस्थिती आहे हे आपण पाहात आहात, असं पाटील म्हणाले आहेत. पाटील यांनी भोंग्याच्या विषयापेक्षा महागाई विषय महत्त्वाचा असल्याचा विचार मांडला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले म्हणून आपणही तसंच करायला पाहीजे असं नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. पाटील यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर राज्यात वाद वाढला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी ट्विट करत उत्तर प्रदेश राज्य सरकारचं कौतूक केलं होतं. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार” 

‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला 

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला 

“…मग केंद्र सरकार काय फक्त घंटा वाजवायला बसलंय का?”