“आम्हाला संधी मिळेल तेथील प्रत्येक उमेदवार विजयी होईलच”

सोलापूर | येत्या विधानसभा निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा निवडूण आणू, असा निर्धार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील तेवढ्या आम्ही निवडून आणू. आघाडीमध्ये आमच्या वाट्याला किती जागा येतील ते बघावं लागेल, मात्र जिथे आम्हाला संधी मिळेल तेथील प्रत्येक उमेदवार विजयी होईलच, असा आमचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात खालच्या स्थरावर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विशेष: यामध्ये भाजप आणि शिवसेना आघाडीवर आहेत. यावरही जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटलांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया येत असते. भाजप ज्या भाषेत बोलत आहे किंवा त्यांना जी भाषा कळते त्यात उत्तर द्यावं लागेल. समोरच्याला समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची काही लोकांची पद्धत असते. त्यामुळे याबाबत कोणाचंही समर्थन करता येणार नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र मास्कमुक्त व्हावा ही आमची देखील इच्छा आहे. लवकरच आपल्याला मास्क न घालता बाहेर फिरण्याची संधी मिळेल. मात्र अजूनही कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी आणि मास्क न घालता घराबाहेर पडू नये, असं ते म्हणालेत.

सर्व नागरिकांनी कोरोना नियमाचं काटेकोरपणे पालन करावं. तरच आपण महाराष्ट्राला मास्कमुक्त करू शकू, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी! 

‘मॅचपूर्वी सेक्स केल्याने मला…’; ‘या’ प्रसिद्ध माजी खेळाडूचा मोठा खुलासा

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…