“… म्हणून लालकृष्ण अडवाणींवर गुन्हा दाखल होऊ शकतो”

मुंबई | बाबरी पाडली तेव्हा मी तिथेच होतो, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस 13 वर्षांचे होते. त्यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) अयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर 13 वर्षांच्या बालकाला अयोध्येला नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, असं जयंत पाटील म्हणालेत.

देशात महागाई इतकी वाढली आहे की सामान्य माणसाला दुसऱ्या दिवशी काय करायचं, हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दडवण्यासाठी प्रयत्न राजकीय भोंगे वाजवले जात आहेत, अशी टीका जयंत पाटलांनी भाजप आणि मनसेंवर केली आहे.

दरम्यान, बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला, तेव्हा आमचे नेते आणि मी स्वतः तेथे होतो. शिवसेनेचा कोणता नेता तेथे होता, हे सांगावे, असं सांगत त्या घटनेवरून फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच फैलावर घेतलं.

तुम्ही रामाच्या बाजूने आहात की, रावणाच्या बाजूने एकदा सांगून टाका, अशी खोचक टिपण्णीही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना केली.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यातील सर्व पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! 

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला आणखी एक झटका, ‘त्या’ नोटीसने टेंशन वाढलं 

सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे यांना अटक होणार?, महत्त्वाची माहिती समोर 

काँग्रेसला सर्वात मोठा झटका, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई!