औरंगाबादच्या विमानतळाचं नामांतर म्हणजे पराक्रमी महाराजांना दिलेली मानवंदना- जयंत पाटील

मुंबई |  औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आजच्या कॅबानेट बैठकीत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं राष्ट्रवादीने स्वागत केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. तसंच यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहील आणि पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांना ठाकरे सरकारने दिलेली ही मानवंदना असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.

गेले अनेक वर्ष औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर या मागणीने जोर धरला आहे. तत्पूर्वी त्या अगोदरचं पाऊल म्हणून औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करून महाराष्ट्राला सरप्राईज देणार आहेत, असा दावा औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तत्पूर्वी विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव देऊन ठाकरे सरकारने एक पाऊल पुढे टाकण्याचं बोललं जात आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-शौचालयाला शिवाजी महाराजांचं नाव नाही; संदीप देशपांडेंचा आरोप प्रसाद लाड यांनी खोडला

-…अन् अजित दोभालांनी पोलिसांना सांगितली जीवा महाला अन् शिवाजी महाराजांची गोष्ट!

-मुलीला पळवून नेण्याची भाषा करणारे आज विधानसभेत- उद्धव ठाकरे

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव; ठाकरे सरकारचा निर्णय

-“ही लोक डोक्यावर पडली आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला??”