“आमचे आमदार फुटणार नाहीत, कुणी फुटलाच तर तो परत विधानसभेत दिसणार नाही”

मुंबई | राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार वाद पेटला आहे. अशातच भाजप नेते विविध दावे करत आहेत.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचं म्हटल्यावर वाद पेटल्याचं पहायला मिळत आहे.

रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीमध्ये काही आमदार नाराज आहेत. ते आमदार माझ्या संपर्कात आहेत निवडणुकीच्या पुर्वी सर्व कळेल, असं म्हटलं होतं.

दानवे यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. परिणामी राज्याचं राजकारण पेटलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर आता चक्क आमदारांना इशाराच दिला आहे. परिणामी राज्यात सध्या पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

आमचे आमदार फुटणार नाहीत, जर फुटला तर पुन्हा तो विधानसभेत दिसणार नाही. लोकच त्याला सळो की पळो करून सोडतील, असं पाटील म्हणाले आहेत.

एखादा फुटला तर आम्ही तिन्ही पक्ष त्याच्या विरोधात एकत्रित लढू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. पाटील यांनी दानवेंच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे.

दरम्यान, सातत्यानं भाजपकडून महाविकास आघाडीतील आमदारांना निशाणा बनवण्यात येत असल्याच्या कारणावरून दोन्हीकडून तणाव वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘अशी’ खोटी कारणं सांगून तुमचा जोडीदार देऊ शकतो धोका, वेळीच व्हा सावधान

 “शिवसेना आता जनाब शिवसेना झालीये”; फडणवीसांची खोचक टोला

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती 

“हिंमत असेल तर काढा दोन्ही कुबड्या आणि लढा स्वबळावर”