सोलापूरच्या खासदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश!; खासदारकी जाणार?

सोलापूर | भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. कारण सोलापूर न्यायालयाने जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांचे टेंशन वाढणार आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी खोटे जातप्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच शिवाचार्य यांचं जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरविलं आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे.

अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांंनी यापूर्वी केली होती. मात्र, आता न्यायालयाने त्यांच्या गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आल्याचं दिसतंय.

दरम्यान, जयसिध्देश्‍वर महाराज यांनी लिंगायत समाजातील बेडा जंगम असल्याचे जात प्रमाणपत्र निवडणुकीवेळी दिले होते. यावर आक्षेप घेत प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीने दाखला तपासावा आणि खासदारांचे प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-बच्चू कडूंनी शेअर केला कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्याचा ‘तो’ व्हिडीओ

-महाराष्ट्रातील 4 कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान

-रानू मंडलचे दिवस सरले… पुन्हा नशिबी आले ‘पुराने दिन’!

रानू मंडलचे दिवस सरले… पुन्हा नशिबी आले ‘पुराने दिन’!

-मोदी पुढे… अमृता फडणवीस मागे; टाकलं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल!