केवळ मला कळावा म्हणून ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक देवेंद्रजींनी लिहिलंय- उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या या पुस्तकाबाबत त्यांचे मत व्यक्त केले.

‘देवेंद्रजी मी कधी विचार केला नव्हता की, अशा कुठल्या विषयावर मला भाषण करावं लागेल. पण हा प्रसंग माझ्यावर तुमच्यामुळे आला. मित्र आशिष शेलार म्हणतात ते बरोबर आहे, आमची मैत्री आहेच आणि माझं काम सोपं कसं व्हावं, केवळ मला कळावा म्हणून ‘अर्थसंकल्प : सोप्या भाषेत’ हे पुस्तक देवेंद्रजींनी लिहिलं आहे. नाहीतर आजपर्यंत तुम्ही इतके अर्थसंकल्प पाहिलेत, मात्र त्यावर पुस्तक कधी लिहिलं नव्हतं’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान म्हणाले.

एक चांगलं झालं तुम्ही आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. पुढील पाच-दहा वर्ष असंच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहित राहा. आम्हालाही नेमक्या उणीवा काय राहिल्या आहेत हे कळेल, अशी कोपरखळी त्यांनी फडणवीसांनी मारली.

उद्धव ठाकरे यांनी पुस्तक लिहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी जो विषय आपल्याला कळत नाही त्यावर तारे तोडू नयेत, असं म्हणत जास्त बोलणं टाळलं. मराठीत कदाचित पहिल्यांदा पुस्तक लिहिलं गेलं असेल असं सांगताना हे पुस्तक सर्वात आधी मीच वाचणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-सोलापूरच्या खासदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश!; खासदारकी जाणार?

-बच्चू कडूंनी शेअर केला कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्याचा ‘तो’ व्हिडीओ

-महाराष्ट्रातील 4 कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान

-रानू मंडलचे दिवस सरले… पुन्हा नशिबी आले ‘पुराने दिन’!

रानू मंडलचे दिवस सरले… पुन्हा नशिबी आले ‘पुराने दिन’!