जिओची गिगाफायबर ब्रॉडबँड सेवा लॉन्च; पाहा काय आहेत प्लॅन आणि ऑफर…

मुंबई | रिलायन्स जियोची घरगुती ब्रॉडबँड सेवा गिगाफायबर गुरुवारी लॉन्च झाली. या सेवेंतर्गत जिओने मोफत टीव्हीसह विविध प्लॅन्स आणि ऑफरही लॉन्च केल्या आहेत. या प्लॅन्सनुसार ग्राहकांना 1 जीबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीड उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या सेवेच्या गोल्ड आणि त्यावरील सर्व प्लॅन्ससाठी 4K स्मार्ट टीव्हीसेटही मोफत मिळणार आहे.

जिओच्या गिगाफायबरचे रेंटल प्लॅन हे 699 रुपयांपासून 8,499 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 100 एमबीपीएसचा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. तर यापुढच्या प्लॅन्ससाठी हा स्पीड 1 जीबीपीएसपर्यंत मिळू शकणार आहे.

699 रुपयांच्या बेसिक प्लॅननंतर गोल्ड प्लॅनचे मासिक भाडे 1299 रुपये आहे. त्यावरील डायमंड प्लॅनचे मासिक भाडे 2499 रुपये आहे. तर प्लॅटिनम प्लॅनचे मासिक भाडे 3999 रुपये आहे.

जिओचा बेसिक ब्रॉन्झ प्लॅन असून यामध्ये युजर्सना 100 एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड डेटा 100जीबी+ 50 जीबी एक्स्ट्रा) मिळेल. त्याचबरोबर यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग मिळेल. यामध्ये युजर्सना भारतातील कोणत्याही क्रमांकावर फोन करता येईल.

849 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 एमबीपीएस पर्यंत स्पीड मिळेल. तर अनलिमिटेड डेटा 200 जीबी + 200 जीबी एक्स्ट्रा मिळेल. यामध्येही युजर्सना मोफत व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळेल.

महत्वाच्या बातम्या-