मुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्र्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेच्या सोलापुरातील सांगता सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. यावरच राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. अमित शहासाहेब… तुम्ही ज्या स्टेडियममध्ये भाषण देत होता तेसुद्धा पवारसाहेबांनी बांधलंय, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
अमित शहा यांनी काल सोलापुरात शरद पवारांनी राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना महाराष्ट्रासाठी काय केलं? याचा हिशेब द्यावा, असं म्हटलं होतं. यावरच आव्हाडांनी ट्वीट करत अमित शहांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राचा अभ्यास करा मग तुम्हाला समजेल पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय काय केलंय, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, कलम 370 हा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा प्रचाराचा मुद्दा कसा होऊ शकतो. मंदीवर कुणी काही बोलणार आहे की नाही? असे सवाल आव्हाडांनी उपस्थित केले आहेत.
तीस वर्षे झाली शरद पवार शरद पवार आणि आता अजित पवार अजित पवार….
अभ्यास करा थोडा महाराष्ट्रचा @AmitShah मग समजेल @PawarSpeaks यांचं योगदान काय आहे ते, ज्या स्टेडियम मध्ये तुम्ही भाषणं देत होतात ना तो दोन दशकांपूर्वी साहेबांनीच बांधला आहे.@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/02yD6HfsPV
— NCP Thane (@ThaneNCP) September 2, 2019
महत्वाच्या बातम्या-
कर्जमुक्ती झालेला एकही शेतकरी मला दिसला नाही- आदित्य ठाकरे https://t.co/PjXgIsXqW6 @AUThackeray @NCPspeaks @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) September 2, 2019
मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही; उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया – https://t.co/e604Yvjhre @kolhe_amol @Chh_Udayanraje @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
“सत्तेत असताना काँग्रेस-राष्ट्रवादींनी माझं एकही काम केलं नाही; मी यांच्याबरोबर का राहाव?” – https://t.co/vvi8qaWrvi @Chh_Udayanraje @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019