नरेंद्र मोदींना बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सार्वजनिक स्वच्छतेच्या हेतूने देशात ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरु करण्याच्या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींना बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने दिली.

मोदींना आणखी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा आणखी एक क्षण आहे.  मोदींच्या मेहनत आणि प्रगतीशील धोरणाची जगभरात प्रशंसा केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचा बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून गौरव केला जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

ऑक्टोबर 2018 मध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी पंतप्रधानांचे कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांच्या फाऊंडेशनकडून मोदींना पुरस्कारही जाहीर झाला आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशात 8 कोटींहून अधिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे देशात पाच लाख गावे ही हागणदारीमुक्त झाली असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन कळालं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांना हा सातवा पुरस्कार मिळत आहे. यापूर्वी सहा मुस्लिम राष्ट्रांनी आणि रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले आहे.

महत्वाच्या बातम्या-