महाराष्ट्र मुंबई

‘मुंबईकरच गटाराची झाकणं उघडी ठेवतात, म्हणूनच अपघात होतात”

मुंबई | मुंबईकरच गटाराची झाकणं उघडी ठेवतात; त्यामुळेच अपघात घडतात आणि लोकं मृत्यूमुखी पडतात, असं मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे. 

मुंबईकरांनो चला जाऊया आणि एखादं काढलेलं झाकण महापौरांच्या तोंडावर ठेऊया, म्हणजे असंबंध बोलणं तरी बंद होईल, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी महापौरांना धारेवर धरलं आहे. 

मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत पाणी तुंबलं होतं. त्यावेळी महापौरांनी वादरग्रस्त वक्तव्य केलं होतं. 

गोरेगावमध्ये अडीच वर्षाचा दिव्यांश उघड्या गटारात पडून वाहून गेला. त्याचा तपास अद्यापही लागला नाही. 

मुंबईच्या गटारात पडून पाच वर्षात 328 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने माहितीच्या अधिकाराखाली दिली आहे.

गटारे, मॅनहोल आणि सुमद्रात बुडण्याच्या 639 दुर्घटना झाल्या. त्यामध्ये 327 लोकांचा मृत्यू झाला. तरीही प्रशासनाला आणखी जाग येत नाही.

 

IMPIMP