पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर; मोदींचे स्वप्न पूर्ण होणार- फडणवीस

सोलापुर |  गेल्या 5 वर्षात राज्यात 15 ते 20 लाख घरे बांधली आहेत. 2022 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देणारं देशातील महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

श्रमिक पत्रकारांचं म्हाडाच्या माध्यमातून 238 सदनिका बांधून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालेय यावेळी ते सोलापुरात बोलत होते.

पत्रकारांच्या घरासंदर्भात शासनाला गेल्या 5 वर्षात निर्णय घेत असताना अनेक अडचणी आल्या. परंतू सोलापुरातील पत्रकारांनी पाठपुरावा केल्याने राज्यात पहिल्यांदाच म्हाडाच्या माध्यमातून 238 सदनिका बांधल्या जात आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्याचे मोदींचे स्पप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे याचा मनोमन आनंद आहे आणि अभिमानसुद्धा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

IMPIMP