मेरा साया भी बडा नमक हराम निकला- जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला

मुंबई | उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांना स्वगृही आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. परंतू त्यात त्यांना अपयथ येत आहे. आता मात्र अजित पवारांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषा बदलली आहे.

मेरा साया भी बडा नमक हराम निकला ! दिन मे मेरे साथ था… रात मे कहीं ओर से निकला, असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. रविवारी मी राष्ट्रवादीतच असल्याचं अजित  पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर पवार साहेबांची राष्ट्रवादी धर्मांध आणि जातीय भाजपविरोधात आहे… अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीत आहेत? असा खडा सवाल आव्हाडांनी अजित पवार यांना केला होता.

80 व्या वर्षी बापाला पोराने आधार देण्याची गरज असते. पण आता या वयात पवारसाहेबांवर ही वेळ आलेली बघवत नाही, अशा भावना काल आव्हाडांनी व्यक्त केल्या होत्या. यावेळी आव्हाडांना आपले अश्रू रोखता आले नव्हते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे अजित पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असं विनवणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना करत आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-