पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेला बेकायदेशीर विवाह नाही; आव्हाडांची शेलारांवर तोफ

मुंबई |  शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी एकत्र येत हॉटेल ग्रँड हयात इथं मोठं शक्तीप्रदर्शन केलं. हा कार्यक्रम संपताच काही क्षणांत भाजप नेते आशिष शेलार यांनी महाआघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने आणि आशीर्वादाने वाजतगाजत होणारे हे लग्न आहे. पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेला बेकायदेशीर विवाह नाही. तुम्ही बहुमत सिद्ध करायला घाबरून कोर्टात नुसते दिवस ढकलताय, असं प्रत्युत्तर आव्हाडांनी शेलार यांना दिलं आहे.

महाआघाडीचा पोरखेळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. ओळखपरेडमुळे विधानसभेचं संख्याबळ सिद्ध होत नाही, गमावलेला आत्मविश्वास वाढवण्याचा हा त्यांचा टुकार प्रयत्न होता, असं म्हणत ‘आम्ही 162’ म्हणणाऱ्यांनी त्या सभागृहात 145 आमदार तरी होते का?, असा सवाल शेलार यांनी  महाआघाडीला विचारला होता.

दरम्यान, महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर भाजप नेते आणि महाआघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे.

 

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट-

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-