“जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगाची नोटीस”; काय आहे प्रकरण?

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार आणि मविआतील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मानवाधिकार आयोगाने (Human Rights Commission) नोटीस पाठविली आहे. आयोगाने सिव्हिल अभियंत्याचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्याप्रकरणी ही नोटीस बजावली आहे.

याप्रकरणी आयोगाने जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासोबत तीन पोलीस अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. त्यांच्यावर या अभियंता युवकाला निर्घूण मारहाण केल्याचे आरोप आहेत.

व्यावसायाने सिव्हिल अभियंता (Civil Engineer) असलेल्या अनंत करमुसे (Anant Karmuse) नामक युवकाला सन 2020 साली सोशल मिडियावर आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे अमानूष मारहाण केली होती.

घटनेनंतर आव्हाडांचे कार्यकर्ते करमुसे या युवकाला आव्हाडांच्या घरी घेऊन गेले होते, यावेळी त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे याला मारहाण केली होती. याप्रकरणी 14 ऑक्टोंबर 2021 रोजी ठाणे पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती.

याप्रकरणी ठाणे न्यायालयाने आव्हा़डांची जामिनावर सुटका केली. तसेच याचिकाकर्ते करमुसे यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयतर्फे (CBI) व्हावा अशी मागणी केली आहे.

न्यायालयाने अनंत करमुसे याची मागणी फेटाळली आहे. आणि मानवाधिकार आयोगाने आमदार जितेंद्र आव्हाडांना नोटीस बजावली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“रवी राणा यांना हिंदू धर्मरक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे”

काही बाही बोलून पंतप्रधान पदाचे महत्व घसरवू नका; राहुल गांधींचा मोदींना सल्ला…

विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीही नाराज; जयंत पाटील म्हणाले…

“ईडी कारवाई मागे लागलेल्या भावना गवळींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली”

आघाडीत बिघाडी?, महाविकास आघाडीबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य