“रवी राणा यांना हिंदू धर्मरक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे”

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीच्या सरकार स्थापनेनंतर त्यांनी आपल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि पहिल्या टप्प्यातील खातेवाटप तब्बल एक महिन्याने 9 ऑगस्ट रोजी केले.

त्यांच्या या नवीन मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत बंडात सामील असलेल्या अनेक आमदारांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता होती. पण पहिल्या टप्प्यातील विस्तारात शिंदे यांच्या गटातील नऊ आणि भाजपच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली.

मंत्रिपदे मिळविण्याच्या शर्यतीत पंकजा मुंडे (Pankaja Munde), रवी राणा (Ravi Rana) आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) होते. परंतु त्यांची घोर निराशा झाली आहे. कारण मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात यांना मंत्रिपदे देण्याचे टाळले गेले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार असताना आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हनुमान चालिसा आंदोलन चालविले होते. पण त्यांना आता मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत त्यांना टोला दिला आहे.

हिंदुत्वासाठी जीवाचे रान करणारे रवी राणा, हनुमान चालिसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झालेत. देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना पद मिळते. याचा अर्थ आता त्यांना नव्याने हनुमान चालिसा वाचण्याची गरज आहे. रवी राणा यांना धर्मरक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांना नवीन मंंत्रिमंडळ भेटणार असून लवकरच त्यांच्या हातात मोठे खाते असेल, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले आहेत.

त्यामुळे आता मंत्रिपदे न मिळालेले आमदार आणि पदाधिकारी कोणता निर्णय घेणार आणि त्यांच्याबद्दल शिंदे सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे आगामी काळात महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

काही बाही बोलून पंतप्रधान पदाचे महत्व घसरवू नका; राहुल गांधींचा मोदींना सल्ला…

विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीही नाराज; जयंत पाटील म्हणाले…

“ईडी कारवाई मागे लागलेल्या भावना गवळींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली”

आघाडीत बिघाडी?, महाविकास आघाडीबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

‘आरती करा त्या संजय राठोडाची’, पूजा चव्हाणची आजीची संतप्त टीका